कोकणनगर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांनी पावसात बसायचे काय ? नगर परिषदेचा अजब कारभार
सध्या रत्नागिरी शहरात लसीकरण सुरू आहे .आज रत्नागिरी येथील कोकणनगर आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते यासाठी नागरिक तेथे जमा झाले होते लसीकरण करताना येणाऱ्या नागरिकानी सुरक्षित अंतर ठेवा असे प्रशासनाचे आदेश आहेत परंतु याठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी कोणती शेड नसल्याने लसीकरण साठी आलेल्या नागरिकांनी पाऊस आल्याने आरोग्य केंद्र इमारतीत गर्दी केली त्यामुळे तेथे सुरक्षित अंतराचा नियम धाब्यावर बसवला गेला पावसाळ्यात लसीकरण सुरूच राहणार आहे लसीकरणासाठी येणार्या नागरिकांना सुरक्षित अंतरावर बसण्यासाठी व पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी पत्र्याची शेड अथवा ताडपत्रीचे शेड घालणं आवश्यक होते परंतु येथे ते घातले गेले नाही याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला विचारले असता रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील लसीकरणाच्या व्यवस्थेची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेची असल्याचे सांगण्यात आले रत्नागिरी नगरपरिषदेने मध्यंतरी शहरातील लसीकरणाची जबाबदारी आमचीच असल्याचे नगरपरिषदेने जाहीर केले होते त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरणासाठी येणार्या नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी शेडची उभारणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे
www.konkantoday.com