पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी घेतला पावसाळी परिस्थिती व कोरोना परिस्थितीचा आढावा
राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थिती बाबत माहिती घेतली. ह्या दोन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री परब यांनी केले आहे.
हवामान खात्यातर्फे रत्नागिरी जिल्ह्याला चार दिवसांसाठी करिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून याबाबत सविस्तर माहिती घेतली.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात असलेल्या व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला जिल्ह्यात परिस्थिती बिघडल्यास तत्काळ मदतकार्य करता यावे यासाठी एनडीआरएफच्या चार टीम दाखल झालेल्या आहेत.
या पावसाचा अधिक धोका डोंगरालगत असणाऱ्या भागात आहे दरडी कोसळण्याचे प्रकार होऊ शकतात तसेच समुद्रकिनाऱ्यालगत गावांमध्ये पाणी शिरण्याचा ही धोका आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी दिली.
रुग्णालयांच्या कामकाजावर या कालावधीत परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालयांमधून जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच ऑक्सिजनचा बफर साठा ही जिल्ह्यात उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली
जिल्ह्यामध्ये असणारी कोरोनाची परिस्थिती व निर्बंध याबाबत आगामी काळात कशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे याबाबतही या दरम्यान चर्चा झाली कोरोनाच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री परब यांनी यावेळी आढावा घेतला.
जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना सुरू आहेत याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. वाढीव रुग्णसंख्या समोर येत आहे तथापि जिल्ह्यात महिला रुग्णालयात अतिरिक्त दोनशे खाटांची व्यवस्था झाल्याने व गावागावात आता गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी ग्रामपंचायती पुढे आल्या आहेत याबाबतही पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सीजन बेडची संख्या आणि उपलब्धता तसेच व्हेंटिलेटर सुविधांबाबत पालकमंत्री यांनी यावेळी माहिती घेतली
सध्या रत्नागिरी जिल्हा कडक निर्बंधांच्या चौथ्या श्रेणीत आहे या कालावधीत चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
www.konkantoday.com