
बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी करणाऱ्या तीन जणांना अटक, दारूच्या नशेत ट्रकचालकांचे कृत्य mumbai bomb rumor
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि भायखळा रेल्वे स्थानक, तसेच अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवल्यात आल्याचा दूरध्वनी शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रणात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला; पण हा खोडसाळपणा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तीन जणांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले होते. त्यांना पोलिसांनी ठाण्यातील शिळफाटा परिसरातून अटक केली.
गणेश आत्माराम शेळके (३१), राजेश विश्वनाथ कांगणे (३५), रमेश ज्ञानोबा शिरसाठ (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे तिघेही ठाणे जिल्ह्यातील शिळफाट्याजवळील दहिसर-मोरी गावचे रहिवासी असून ट्रक चालक आहेत.
www.konkantoday.com