राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता पायी जावं लागणार नाही. लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात आणि पुण्यातील राजगड किल्ल्यावर फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांनी शुक्रवारी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता काही मिनिटांमध्ये भाविकांना येथे जाता येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या.
www.konkantoday.com