रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांचे लसीकरण ,महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुषांना १ लाख ३५ हजार ६१५, तर महिलांना १ लाख १७ हजार ६९४ डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे डोस घेण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषच पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरुवातीला लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरणाला सर्वाधिक पुरुष प्राधान्य देत आहेत. मात्र, महिलांचे प्रमाण कमी आहे. ,अनेक महिलांना घरकामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतांश महिला लसीकरणापासून दूर राहिल्या असल्यानेच पुरुषांपेक्षा त्यांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.
www.konkantoday.com