
कासारी सांडेलावगणची इमारत अपूर्ण, पण फलकावर इमारत पूर्ण कामाची चाैकशी करण्याची – अनिकेत पटवर्धन यांची मागणी
रत्नागिरी – जनसुविधा कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासारी सांडेलावगण इमारत
बांधण्यासाठी १२ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात आले. कार्यारंभ आदेश १ जानेवारी २०२० ला मिळाला व काम १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण झाले. परंतु ही इमारत अपूर्णावस्थेत असून काम पूर्ण झाल्याचा फलक प्रदर्शित करण्यात आला आहे,
याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली
आहे.
यासंदर्भात श्री. पटवर्धन यांनी अधिक माहिती अशी की, अलीकडे कासारी सांडेलावगणचा दौरा केला. त्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. या कार्यालयाचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणंमत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये २३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता झाले. या वेळी जि. प. अध्यक्ष, सभापती, पं. स. सभापती, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. तसा फलकही इमारतीच्या आवारात प्रदर्शित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मांजरेकर, उपसरपंच सौ. सुचिता बेंद्रे, ग्रामसेवक विनायक सावंत तसेच सर्व सदस्य उपस्थित होते, असे फलकावर लिहिले आहे.
लाखो रुपये खर्चून उभ्या राहणाऱ्या इमारतीचे काम सुमारे दीड वर्षानंतरही अपुरेच आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे. या इमारतीची पाहणी केली असा फक्त इमारत उभी राहिली आहे. परंतु आतील सर्व कामे अपूर्णच
आहेत. निधी कमी पडला का, ठेकेदाराने काम अपूर्ण का ठेवले, असे प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. या इमारतीसाठी अंदाजपत्रकीय
रक्कम १२ लाख ७१ हजार रुपये असून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी काम पूर्ण झाल्याचा फलकही या इमारतीला लावण्यात आला आहे. परंतु आतून बाहेरून या इमारतीला प्लास्टरिंग किंवा रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. आतील कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम त्वरित करावे आणि काम पूर्ण न होता फलक कसा काय लावण्यात आला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com