
बनावट नोटाप्रकरणी टोळी पकडली गेली म्हणून अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यात आल्या असत्या बनावट नोटा
कर्नाटकातील दांडेली येथे बनावट नोटा प्रकरणी एक टोळी पकडण्यात आले त्यामध्ये रत्नागिरीचे दोन आरोपी होते पोलीस तपासमध्ये आरोपी रत्नागिरी जिल्ह्य़ात बनावट नोटा खपवण्याचा तयारीत होते असे निष्पन्न होत आहे
काही दिवसांपूर्वी कर्नाटक येथे बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.सुमारे ९ लाख रूपयांच्या बनावट नोटा रत्नागिरीत चलनात आणण्याचा घाट त्यांनी घातला होता. त्यांचे अन्य साथीदार रत्नागिरी कार्यरत आहेत का याबाबत कर्नाटक पोलिसांकडूनअधिक तपास सुरु आहे .
बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या ३ जून २०२१ रोजी दांडेली पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्याच्यांकडून सुमारे ७२ लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांकडून ६ जणांना अटक करण्यात आली होती.यामध्ये रत्नागिरीतील किरण देसाई (४०,मजगांव रोड) व गिरीष पुजारी (४२,जाकादेवी) यांना बनावट नोटांसह ताब्यात घेण्यात आले होते.९ लाख रूपयांच्या बनावट नोटा किरण देसाई व गिरीष पुजारी हे रत्नागिरीत आणणार होते.यासाठी किरण व गिरीष यांनी दांडेली येथे राहणारा शिवाजी कांबळे याला ४ लाख रूपये देऊन ९ लाख रूपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार केला.हा व्यवहार सुरू असतानाच दांडेली पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती.
www.konkantoday.com