जिल्हा ठिकाणी असलेले शासकीय रुग्णालयच व्हेंटिलेटरवर

0
36

रत्नागिरी जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यात मृतांची संख्या वाढत आहे सामान्य लोकांचा आधार असलेल्यारुग्णालयातचआरोग्ययंत्रणेची कमतरता जाणवत आहे सध्या व्हेंटिलेटर बेडचीकमतरताउपचारातील अडचणीचा विषयबनलेला आहे. व्हेंटिलेटरसाठी रत्नागिरीतील दोन्ही शासकीयरुग्णालयात रुग्णांना ‘वेटिंग’ वर रहावे लागत आहे उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर बेडपेक्षा रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड रिकामी
होईपर्यंतची प्रतिक्षा रुग्णांसाठी अनेकवेळा जीवघेणी ठरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्याला बसलाआहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून मृत्यूचादर दिवसाला वाढतच आहे.वृद्धासह या लाटेत तरुणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधित उशिराने दाखल होत असल्याचे कारणआरोग्य यंत्रणेकडून दिले जात आहे. ते कारण काही अंशी योग्यअसले तरीही जिल्हा शासकियरुग्णालयातील व्हेंटिलेटर बेडचीअपुरी संख्या हा गंभीर विषय विषयबनलेलाआहे.रुग्णांच्या संख्येनुसार व्हेंटिलेटर बेडस् उपलब्ध होत नसल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरबेडसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.तर काहींना नाइलाजाने खासगी हॉस्पिटलची वाट धरावी लागत आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here