कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार

0
27

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या. त्यामध्ये 02619/02620 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर सेंट्रल या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. करोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे. गेल्या काही काळापासून बंद असलेली ही गाडी येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगलोर ते एलटीटी मार्गावरील 02619 क्रमांकाची गाडी मंगलोर येथून येत्या १५ जून ते ३० जून या कालावधीत दररोज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या मार्गावर 02620 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ जून ते एक जुलै या काळात दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंगलोर येथे पोहोचेल. या गाड्यांना बावीस डबे असतील. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. एलटीटी-मंगलोर मार्गावरील गाडीला माणगाव आणि खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अधिक थांबे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here