
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मान्सूनच्या पावसाला सुरवात
मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दोन दिवस आधीच आगमन केले आहे. दर वर्षी साधारणत: ७ जूनपासून पावसाला प्रारंभ होतो. मात्र, गेल्या पाच – सहा वर्षांपासून पावसाच्या आगमनात अनियमितता आली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर गेले दोन दिवस काहीसा रेंगाळलेल्या मान्सूनने मंगळवारपासूनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरसण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी मान्सून सरी सिंधुदुर्गात कोसळल्या.
हवामान खात्याने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मान्सूनने आपली चुणूक दाखवली आहे. पुढील दोन दिवसात कोकणसह सर्वच भागात धुवाधार पर्जन्यवृष्टी होणार आहे. कोकणातील भात पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. मान्सून बरसण्यास सुरूवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
www.konkantoday.com