
महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांचे इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन नुकतेच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम यांच्या हस्ते झाले.

*मा. आमदार श्री. किरण उर्फ भैय्या सामंत* यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या वेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, खजिनदार प्रदीप साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, मनोहर गुरव, बलराम कोतवडेकर, दीपक पवार, सुनील घोसाळकर, अमित लांजेकर, पराग पाटणे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दिशा साळवी, स्मितल पावसकर, कांचन नागवेकर, पूजा पवार , मनिषा बामणे, नंदिता साळवी , राजन शेट्ये, सुदेश मयेकर, निमेश नायर, जयसिंग घोसाळे, प्रकाश शिंदे, संजय हळदणकर, रुपेश पेडणेकर, निलेश मुळे , बाळू गांगण उपस्थित होते.आर्टिफिशल टर्फ मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर रत्नागिरी येथे या स्पर्धा चालू आहेत.महिलांच्या एकूण 12 संघानी भाग घेतला आहे.
