
दापोली तालुक्यात वणंद गवळवाडी येथे एक फार्म हाऊस परिसरात रानगव्याचे दर्शन
दापोली तालुक्यात वणंद गवळवाडी येथे एक फार्म हाऊस परिसरात रानगव्याचे दर्शन झाले.सोमवारी सायंकाळी उशिरा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रा.डॉ. प्रफुल्ल माळी हे आपल्या जागेवर चालले असताना हा मोठा रानगवा नजरेस पडला आहे. ते यावेळी कारमध्ये असल्याने सुरक्षित होते. मात्र यावेळी त्यांनी या रानगव्याचे फोटो व व्हिडीओ शूट केले आहे.दरम्यान वनविभागाने या विषयाची माहीती घेऊन रानगव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
www.konkantoday.com