अवघड वळणाचा अंदाज चुकल्याने महामार्गावरील भोस्ते घाटात टँकर पलटी होऊन अपघात ,सुदैवाने मनुष्यहानी टळली

खेड : अवघड वळणाचा अंदाज चुकल्याने महामार्गावरील भोस्ते घाटात टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने मनुष्यहानी टळली असली तरी टँकरचे पूर्णतः नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री घडला.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा अवघड घाट मानला जातो. नागमोडी वळणे आणि तीव्र उतार यामुळे हे घाट उतरताना जाड वाहनांच्या चालकांच्या पोटात गोळा येतो. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर हा धोका टळेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. येथील मोबाईल टॉवर नजीक असलेल्या काटकोनी वळणाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत.
महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी काहीच उपायोजना केली जात नसल्याने किंवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला तशा सूचना दिल्या जात नसल्याने या घाटातील अवघड वळणावरील धोका आजही कायम आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button