शिवसेना मंत्री उदय सामंत किती खोटे बोलणार – निलेश राणे
कोकणासाठी २५२ कोटी सोडा अडीच हजार रुपये सुद्धा दिले नाहीत
रत्नागिरी:
कोकणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी हे दिल ते दिलं हे आता हवेत गोळी मारायचं सोडून द्या. लोकांच्या लक्षात आलंय की तुमचे २५२ कोटी रुपये द्यायची लायकी तर नाहीच, तुम्ही साधे अडीच हजार रुपये सुद्धा देऊ शकत नाही तेवढी पण लायकी नाही हे आता कोकणातील लोकांच्या लक्षात आलेल आहे. असा निशाणा साधत भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्या मुख्यमंत्र्यांनी 252 कोटी दिल्याच्या सामंतांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.
तौक्ते वादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले. वादळामुळे झाडे उमळून पडली, वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी घरांची पडझड , शाळा, शासकीय कार्यालय, गोठे, बागांची प्रचंड नुकसान झाले. तौक्ते वादळाला महिना झाला तरी सेनेच्या पालकमंत्री, खासदार आमदारांकडून नुकसानग्रस्तांना कवडीची मदत दिली गेली नाही. तसेच प्रशासनाकडून पंचनामे होऊन सुध्दा नुकसानग्रस्तांना मदत पोहचली नाही. सामंतांनी असे खोटं वक्तव्य करून वादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. कोकणातील जनतेच दिशाभूल करायचं काम करत आहेत अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्ताकडून उमटताना दिसत आहे.
यावर राणे यांनी सामंत यांच्या खोट्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. राणें म्हणाले की, सामंत नेहमीप्रमाणे खोटे बोलले. त्याचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणासाठी २५२ कोटी पाठवले. ते खोट आहे. कारण असे कुठलेचं पैसे २५२ कोटी सोडा २५२ रुपये सुद्धा कोकणाला आलेले नाहीत. मी प्रत्येक डिपार्टमेंट मधून फोन करून माहिती घेतली. असे कुठलेच पैसे आलेले नाहीत. फक्त जीआर निघालेला आहे. असा जीआर दुसऱ्या दिवशी रद्द देखील होतो. हे आम्ही अनेक वर्ष ह्या तुमच्या कारभारामुळे आम्हाला ते लक्षात आलेल आहे. सामंत किती खोट बोलणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com