
रत्नागिरी शहरातील डास फवारणी योजना कागदवरच!,नगराध्यक्षांच्या आदेशानंतर काही भागात फवारणी सुरू
रत्नागिरी शहरात डासांपासून साथी पसरू नयेत यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी तातडीने फॉगिंग मशीन व फवारणी यंत्र खरेदी केली होती.रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने या मशीनद्वारे शहरातील विविध प्रभागात डास निर्मूलनासाठी फवारणी करावी असे सूचनाही देण्यात आल्या होत्या.परंतु प्रत्यक्षात अशी फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी खुद्द नगरसेवकांनीच केल्या आहेत.यातील काही मशीन विविध कारणांमुळे व मशीन चालवण्याची माहिती नसल्याने बंद पडली असल्याचेही कळते. या सर्वाला आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे होते.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत हा विषय पुढे आला.नगराध्यक्षानी याप्रकरणी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना फैलावर घेऊन तातडीने उपाययोजना करून अहवाल देण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आता आरोग्य खात्याने शहरात काही भागात डास सुरुवात केली आहे.
www.konkantoday.com