वेळणेश्‍वर बोगस निविदा प्रकरणी कारवाई करण्यास चालढकल

गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वर ग्रामपंचायतीने बोगस पद्धतीने प्रसिद्ध केलेल्या निविदेचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणाची कारवाई करण्यासाठी विस्तार अधिकारी यांनी चालढकल केली आहे. तर गटविकास अधिकारी यांनी सात दिवसांच्या आत मागविलेल्या खुलाशालाही सरपंच व ग्रामसेवकांनी धुडकावले असल्याने तक्रारदार सुरेंद्र घाग यांनी पुन्हा तक्रार दाखल केली आहे.तालुक्यातील वेळणेश्‍वर ग्रामपंचायतीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ९ कामांची निविदा एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली. सदर वृत्तपत्र रत्नागिरी शहरातील ठराविक बुकस्टॉलवर असतो. इतर आठ तालुक्यात येत नाही. यामुळे तक्रारदार यांनी सदर वृत्तपत्राच्या २९ फेब्रुवारी २०२४ च्या प्रती मागवल्या असता त्यामध्ये निविदाच नव्हती. यामुळे केवळ चार ते पाच वृत्तपत्रांच्या प्रतींवर निविदा छापून बोगस निविदा करण्याचा प्रकार वेळणेश्‍वर ग्रामपंचायतीने केला होता. यावर सुरेंद्र घाग, ऋषिकेश गोखले आदी ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button