रामदेव बाबांवर अंकुश ठेवण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार अॅलोपथी व्यवसाय इतका नाजूक नाही
दिल्ली हायकोर्टाने योगगुरु रामदेव बाबा यांना अँलोपथीच्या विरोधात किंवा पतंजलीच्या कोरोनिल किटच्या बाजूने वक्तव्य करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार रामदेव बाबा आपलं मत व्यक्त करु शकतात असं कोर्टाने सांगितलं आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनकडून दाखल याचिकेवर हायकोर्टात न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
रामदेव बाबा चुकीच्या पद्धतीने कोरोनिल करोनावरील उपचार असल्याचं भासवत असून सध्याच्या उपचारांबद्दल किंवा अॅलोपथीबद्दल चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. कोर्टाने यावेळी रामदेव बाबांना समन्स बजावत पुढील सुनावणीपर्यंत नव्या उपचारपद्धतीविरोधात कोणतंही वक्तव्य करु नये असा सल्ला दिला आहे. मात्र त्यांचं उत्तर येईपर्यंत निर्बंधाचा कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. अॅलोपथी व्यवसाय इतका नाजूक नाही असंही कोर्टाने यावेळी सांगितलं.
www.konkantoday.com