
मंडणगड तालुक्यात एकाचवेळी १७८ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ
मंडणगड तालुक्यात दि. २५ ते २९ मे दरम्यान करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल २ जून राेजी आराेग्य विभागाला प्राप्त झाला. या अहवालानुसार एकाचवेळी १७८ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे अहवाल उशिराने प्राप्त झाल्याने काेराेनाबाधित रुग्ण अनेक ठिकाणी फिरल्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com