
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात
मुंबई महापालिका निवडणूक
फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास ९ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तर फेब्रुवारीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहे.
www.konkantoday.com