दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा भारतीय किसान युनियनचा आराेप

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राजधानी दिल्ली मात्र, हिंसाचार ढवळून निघाली. शेतकरी आणि पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आरोप-प्रत्यारोपांचा रणधुमाळी रंगली आहे. ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. त्यावरून बरंच वादंग सुरू असताना दीप सिद्धू हे नाव समोर आलं आहे. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला. दीप सिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे, असं देओल यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button