धोक्याच्या पातळीवर असलेले खेम धरणाचे दुरुस्तीचे काम हे १० जूनपर्यंत पूर्ण होणार -आमदार योगेश कदम
धोक्याच्या पातळीवर असलेले खेम धरणाचे दुरुस्तीचे काम हे १० जूनपर्यंत पूर्ण होणार असून आता धरणाची गळती थांबणार आहे. त्यामुळे पाणीसाठा होऊन पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल; असे आमदार योगेश कदम यांनी सांगितले. धरणाच्या कामाची पाहणी करण्याकरता आले असताना ते बोलत होते. धरणाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या १० जून पर्यंत ते काम पूर्ण होऊन धरणाची गळती थांबेल. धरणाच्या पुढच्या भिंतीचे काँन्क्रीटीकरणाचे काम हे पावसाळ्यानंतर पूर्ण होईल. नंतरच धरण ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येईल. या कामात कोरोना महामारीमुळे अडथळे निर्माण होत आहेत तरी पण लवकरच गाळ काढण्याचे काम करून घेऊ असे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
www.konkantoday.com