
रंगविलेल्या व सजवलेल्या बोटी पारंपारीक वेशभूषेत सजलेले कोळी बांधव, चाळीस वर्षांनी रंगल्या स्पर्धा
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत आयोजित केलेल्या बिगर यांत्रिकी नौका स्पर्धेला वाल्मिकीनगर परीसरातुन नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.पोलीस निरीक्षक सूर्य यांच्या प्रयत्नांमुळे 40 वर्षांनी पुन्हा एकदा दर्याचा कोळी राजा स्पर्धे निमीत्त सागरात उतरला. स्पर्धेकरीता रंगविलेल्या व सजवलेल्या बोटी पारंपारीक वेशभूषेत सजलेले कोळी बांधव असे नयनरम्य दृष्य याचि देही याचि डोळा यानिमीत्ताने परिसरातील नागरीकांना पाहता आला. बुधवारी सकाळी 11 वाजता स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत तसेच नारळी पौर्णिमेच्या सणानिमीत्ताने या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सुमारे 17 स्पर्धक बोटींनी सहभाग घेतला होता. प्रत्येक बोटीवर तिन जणांची टिम स्पर्धेत सहभागी झाली होती. अतीशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये जीवन आत्माराम पाटील यांच्या बोटीने प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रणय नारायण रघुवीर यांच्या बोटीने व्दितीय क्रमांक पटकावला. यावेळी विजेता व उपविजेता दोघांनाही चषक, प्रमाणपत्र, व रोख रक्कम देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट बोट सजावटी करीता जितेंद्र चैगुले यांच्या बोटीने क्रमांक पटकवीला. यावेळी उत्तम कामगीरी केलेल्या माजी पोलीस पाटील शंकर घागरूम, रमेश बैकर, सिध्दार्थ गमरे, शंकर खेराडे, बाळाराम तांबे तसेच माजी सैनिक सुधीर दळवी रा. नायणे तसेच नाकरीकांचाही सन्मान पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला.
www.konkantoday.com