संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कोंडगाव काजळी नदी गाळ उपसा आणि रुंदीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कोंडगाव काजळी नदी गाळ उपसा आणि रुंदीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा बुधवारी पूर्ण झाला. ८ फेब्रुवारी रोजी गाळ उपशाचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी दत्त देवस्थान, दत्त पतसंस्था, कोंडगाव ग्रामपंचायत, व्यापारी मंडळ यांनी सहकार्य केले होते. दिवस रात्र सुरू असलेल्या या कामादरम्यान जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रातील गाळ उपसा करून नदीची रुंदी व खोली वाढविण्यात आली आहे. या कामानंतर पुराच्या पाण्यामुळे बाजारपेठेला निर्माण होणारा धोका कमी होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com