राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अपघाती विमा सुरक्षेच्या धर्तीवर कोरोना उपचारासाठीही विमा सुरक्षा कवच देण्याची युवा सेनेची मागणी
राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अपघाती विमा सुरक्षेच्या धर्तीवर कोरोना उपचारासाठीही विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी युवा सेनेने राज्य सरकारकडे केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तरुणांना अधिक विळखा घातला आहे. आता तिसरी लाटही येणार असल्याने महाविद्यालयीन तरुणांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे. यदाकदाचित त्यांना कोरोनाची लागण झाली तर उपचारासाठी विमा सुरक्षा सरकारने प्रदान करावी असे निवेदन युवा सेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. विशेष कुलगुरू निधी तसेच विद्यापीठ आपकालीन निधीमधून विद्यार्थ्यांना ठरावीक रक्कम कोरोनावरील उपचारासाठी मंजूर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे
www.konkantoday.com