
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावर पावसाचे सावट
रत्नागिरी:काल वाजत गाजत अलेल्या गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या वेळी देखील पावसाने मोठी हजेरी लावली असतानाच आज दीड दिवसाच्या गणपतीबाप्पाना निरोप देण्यात आला. आज दिवसभर रत्नागिरी शहर परिसरात पावसाने जोर केला होता. यामुळे दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला देखील पावसाचे सावट आहे. जिल्ह्यात दीड दिवसाचे १० हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे व वार्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. असे असले तरी गणेशभक्तांनी मात्र दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात केले.
www.konkantoday.com