
आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय-माजी खासदार निलेश राणे
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कोविड सेंटरमधील नृत्यावरून सुरू झालेला राजकीय थयथयाट अजून सुरूच आहे. आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कोविड सेंटरमधील नृत्यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं २०२४पर्यंत नाचून घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
www.konkantoday.com