
Covid-19 स्पर्धेमध्ये फेरमूल्यांकन करून निवळी ग्रामपंचायतीचे नाव समाविष्ट करण्याची भाजपाची मागणी
भारतीय जनता पार्टी च्या वतीने ग्रामपंचायत निवळी च्या कोविड पुरस्कार मागणीसाठी पाठिंबा देण्यात आला.त्या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाला दिले यावेळी राजेश सावंत,जिल्हा सरचिटणीस भा.ज.पा., मा.सतेज नलावडे,तालुका सरचिटणीस भा.ज.पा. रत्नागिरी. हे उपस्थित होते या निवेदनात असे म्हटले आहे की
कोरणा प्रादुर्भाव कालावधीमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजना संदर्भात ऑगस्टमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचे मूल्यांकन करून 15 ऑगस्ट रोजी पहिल्या त्यांच्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना गौरवण्यात आले होते निवळी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहभागाने उत्कृष्ट काम केले आहे त्याचाच परिणाम म्हणून आतापर्यंत करोनाचे बाबतीत संघटितरीत्या ते लढू शकले आहेत याबाबत आपण सर्वांनी मिळून गावच्या पाठीवर शाबासकीची पाठ मारणे गरजेचे आहे स्पर्धे मध्ये संदर्भातले बहुतांशी निकष त्यांनी पूर्ण केले असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळे गावाला पारितोषिकाचा पासून मुकावे लागले आहे त्यामुळे गावाचा दृष्टिकोन नकारात्मक होईल वरील आपण जातीने लक्ष घालून झालेल्या अन्याय दूर करावा व मूल्यांकन करून अधिकाऱ्याने समाविष्ट न केलेल्या गुणांना त्यामध्ये अंतर्भूत करून निवळी ग्रामपंचायतीचे नाव घोषित करावे अन्यथा त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार असल्याचे भाजपाने या निवेदनात म्हटले आहे
www.konkantoday.com