
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावी आणण्याचा प्रयत्न -आ. योगेश कदम
कोकणात गणेशोत्सव हा महत्वाचा सण आहे. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असतात. सध्या असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सवासाठी येता येईल की नाही याची चाकरमान्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र योग्य ती खबरदारी घेवून गणेशोत्सवासाठी येवू इच्छिणार्या चाकरमान्यांना गावी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे आ. योगेश कदम यांनी स्पष्ट केले असून यासाठी नियोजनासाठी संबंधित पदाधिकार्यांची बैठक त्यांनी नुकतीच आयोजित केली होती.
www.konkantoday.com