
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना पितृशोक
चिपळूण : गुहागरचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांचे वडील भाऊराव शिवराम जाधव यांचे तुरंबव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा तुरंबव येथील राहत्या घरापासून काढण्यात आली. यावेळी राजकीय क्षेत्रातील तसेच पंचक्रोशितील विविध मान्यवर, उद्योजक सहभागी झाले होते. भाऊराव जाधव यांच्या पश्चात आ. भास्कर जाधव यांच्यासह मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे, नात सुना, पुतणे असा परिवार आहे.