मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही हे सामंतांना महिती आहे, त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला -माजी खासदार निलेश राणे

शिवसैनिकांसमोर सामंत कसे ढोंग करतात तो खरा चेहरा आज फाडला. दोन तासातच शिवसेनेचे आमदार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. सामंत कसली संस्कृतीची वार्ता करताय? अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे २०१९ च्या निवडणूकित तुमची सगळी संस्कृती काढली होती.सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नका. अनेक माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात त्यावेळी सामंत भेटायला जात नाहीत. म्हणून ही राजकीय संस्कृती सामंतांच्या तोंडातून शोभत नाही. असा जोरदार प्रहार भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सामंतावर केला आहे.मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही हे सामंतांना महिती आहे, त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला, असे निलेश राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मी केलेले आरोप हे सामंत यांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी केले होते. शिवसैनिकांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर सामंत जे ढोंग करतात तो खरा चेहरा मी उघडकीस आणला. या सामंतांनी कधीच दखल घेण्यासारखे काम केले नाही, त्यामुळे ते दखल घेण्यासारखेही नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. सामंतांनी जनसेवा करावी, कामे करावीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, वादळ होऊन गेल आहे. फक्त आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि भविष्यात भाजप येणार हे नक्की असल्यामुळे पुढची पेरणी करायची म्हणजे उद्या अडचणीचं वाटलं तर उडी मारायला बरी, हे सामंतांचे जुने धंदे असल्याचे सांगत निलेश राणे यांनी उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button