मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत,-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण पाहायला मिळत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असंही चित्र दिसून येत आहे. कारण, हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मागच्या युतीच्या सरकारसारखी आमच्यात नळावरची भांडणं नाहीत, असं पटोले यांनी म्हटलंय. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
www.konkantoday.com