प्रौढावर झालेल्या प्राणघातक हलामुळे मटका-जुगार व्यवसाय पुन्हा ऐरणीवर, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज
खेड : पत्ते आणि आर्थिक देवाण-घेवाण यातून शहरातील साठे मोहल्ला येथील प्रौढावर २१ वर्षाच्या युवकाने केलेल्या प्राणघातक हल्लामुळे खेड शहरात छुप्या पद्धतीने चालणारा मटका-जुगार व्यवसाय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या व्यवसायाबाबत आवाज उठवणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवर याच व्यावसायातील गुडांनी जून २०१९ मध्ये हल्ला करुन आम्हाला कायद्याचेही भय उरले नसल्याने दाखवून दिले होते. आता याच व्यवसायातील देवाण-घेवाणीतून प्रौढावर प्राणघातक हल्ला झाला असल्याने पोलिसांनी आतातरी मटका-जुगार व्यवसायाशी संबधित असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
रविवार दिनांक २३ मे रोजी खाडीपट्ट्यात जाणाऱ्या खेड बहिरवली रस्त्यालगतच्या नांदगाव येथे एक प्रौढ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळून आला होता. प्राणघातक हल्लामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या प्रौढाला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले मात्र पोलीस तपासात हल्ल्याचे जे कारण पुढे आले आहे हे चोरी छुपे चालणाऱ्या मटका-जुगार या व्यवसायाचे सर्वसामान्यांवर होणारे गंभीर परिणाम दाखवणारे आहे. या प्रकणाचा तपास करणारे खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांनी केवळ दोन तासात आरोपीला गजाआड केले. अवधूत राजेश घोडे असे या संशयित आरोपीचे नाव असून तो कोष्टीआळी परिसरातील वरवाटकर संकुल येथे राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील केवळ २१ वर्षाचा युवक आहे. पत्त्याच्या खेळातून झालेल्या देवाण-घेवाणीतून राग डोक्यात गेला आणि या युवकाने त्या प्रौढावर प्राणघातक हल्ला केला. आता कायदा त्या युवकाला काय शिक्षा द्यायची तो देईल परंतू सध्या कोरोनासार महामारीत त्याच्या कुटुंबावर काय वेळ आली असेल याची केवळ कल्पना केलेली बरी!
अवधूत घोडे यांने त्या प्रौढावर केलेल्या हल्ल्याची जड ही पत्ताचा खेळ म्हणजे मटका-जुगार हा व्यवसाय आहे. खेड मध्ये हा व्यवसायच सुरु नसता तर हा गुन्हा घडण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. मात्र या व्यवसायिकांना पोलिसांचीही भिती राहिली नसल्याने २१ वर्षे वय असले कोवळे तरूण प्राणघातक हल्ला करण्यासारखे कृत्य करायला प्रवृत्त होत आहेत.२०१९ मध्ये एका मटका-व्यवसायिकाच्या गुंडानी माध्यमांच्या प्रतिनिर्धीवर हल्ला केला तेव्हाच पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत समाजाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या मटका व्यवसायिकांवर कठोर कारवाई करायला हवी होती मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना सहकार्य करण्याऐवजी मटका व्यवसायिकांचीच पाठराखण केली. शेवटी न्यायासाठी पत्रकारांना उपोषणाचे हत्यार उपसाावे लागले. सलग सात दिवस पत्रकारांनी उपोषण केल्यावर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक केली. पुढे पत्रकारांच्या रेट्यामुळे मटका व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या दहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातून तसा आदेशही पारित झाला. मात्र तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरिक्षक यांच्या मेहरबानीने तडीपार झालेले आरोपी खुलेआम खेड शहरात फिरत होते. त्यांच्या शहरातील वास्तव्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा पोलीसांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा मग आम्ही कारवाई करू’ असे सांगण्यात आले
मटका-जुगार हा व्यवसाय म्हणजे समाजाला लागलेली किड आहे. यामध्ये व्यवसायिक गडगंज होतो मात्र खेळणाऱ्याच्या संसाराची राख-रंगलोली होते. पोलिसांनी मनात आणले तर हा व्यवसाय पूर्णपणे बंद करणे सहज शक्य आहे मात्र पोलिसांच्या मनात येत नाही हेच खरे दुर्दैव आहे.
www.konkantoday.com