
परजिल्ह्यातील शिक्षक भरती करण्यात आली तर त्या शाळेलाच कुलूप ठोकणार -सुरेश भायजे.
रत्नागिरी जिल्हा हा परप्रांतीयांच्या नोकरीचा अड्डा बनला आहे. इथे सरकारी नोकरीला लागायचं, दोन तीन वर्षे नोकरी करायची आणि पुन्हा आपल्या जिल्ह्यात निघून जायचे, असं सर्रासपणे चाललेल आहे. जर कंत्राटी शिक्षक भरतीतही पर जिल्ह्यातील शिक्षक भरती करण्यात आली तर परप्रांतीयांची मग्रुरी मोडणयासाठी त्या शाळेलाच कुलूप ठोकणार व संबंधित भ्रष्ट अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा सज्जड इशारा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला आहे.यातून जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असेह भायजे यांनी म्हटले आहे. नुकतीच पवित्र पोर्टलमधून रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत १५०० शिक्षक भरती केली गेली. त्यामध्ये फक्त स्थानिक १४ मुलांचा समावेश आहे. ही बाब स्थानिकांसाठी अत्यंत अन्यायकारक व संतापजनक आहे. पदवीधर व डीएड, बीएड अर्हताधारक स्थानिक बेरोजगारांना की ज्यांनी यापूर्वी ११ महिने कंत्राटी शिक्षक म्हणून ९ हजार रू. मानधन तत्वावर सेवा बजावली आहे. त्यांना या शिक्षक भरतीत संधी मिळावी, अशी रत्नागिरीवासियांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी १५ ते २३ ऑगस्ट असे ९ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.www.konkantoday.com




