
ओम् साई समर्थ, नाटेचे कार्यकर्त्यांनी केली चिपळूणवासियांची मदत!
चिपळूणला आलेल्या महापुरा अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या जाणिवेतून नाटेवासियांना वस्तू रुपी मदत आरएसएस राजापूरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाठवली होती. पण श्रमदानची आवश्यक आहे समजल्यावर नाटे येथील ओम् साई समर्थ मंडळातील कार्यकर्त्यांची ३३ जणांची टीम चिपळूणला २६ जुलैला पोहोचली. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने पेठम्हाप, कावळेथर येथील अनेक घराची आणि एक मुख्य रस्ता, एका मंदिराची पूर्ण स्वच्छता केली गेली. जाताना मडळाने घेऊन गेलेल्या स्प्रे पंपचा वापर स्वाच्छतेसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करण्यात आला.. जनरेटर, ३ पंप, पेट्रोल, १००० लिटर पाण्याची टाकी, बॅरल, ट्रे, दोन स्प्रे पंप, ४ गण, झाडू, मॉप, घमेलं, फावडी, फिनाईल व पुरेसे मनुष्यबळ या मुळे खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकले. अनेक चिपळूणवासियांना ओम् साई समार्थच्या सुसज्ज टीम बद्दल मंडळाबद्दल खूप छान अभिप्राय दिला. दरम्यान मंडळाने नेलेल्या अन्नधान्य, कपडे, पाणी बॉटल्स, बिस्किट्स इत्यादी वस्तू शंकरवाडी परिसरातील गरजवंताना घरी जाऊन पोहोचवल्या.
चिपळूण वासियांकरिता श्रमदान रुपी मदतीचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष प्रथमेश बांदकर यांनी केले आहे. ओम् साई समर्थच्य या चिपळूण श्रमदान मोहिमेमध्ये मनोज आडविरकर, आप्पा नार्वेकर, बंटी गडकर, प्रथमेश बांदकर, परेश लकळे, सचिन थलेश्री, विघ्नेश आडविरकर, भूषण नार्वेकर, अनिकेत गिरकर, जितू बाणे, केतन दळवी, समीर भोसले, संदीप बंदरकर, अनिल ठाकरे, राहुल लकेश्री, तुषार बंडबे, महेश कारकर, शंकर हळदणकर, सचिन साळवी, रुपेश मिराशी, नितीन करगुटकर, गुरू अनसुरकर, केशव साळवी, नितीन तोसकर, बंड्या चव्हाण, दिवेश मांडवकर, राज चव्हाण, संतोष चव्हाण, प्रमोद साखरकर, सिद्धेश थलेश्री, दिलीप लकेश्री,नरेश साखरकर हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
www.konkantoday.com
