
काळबादेवी सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळला
काळबादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर आणलेला अविश्वास ठराव ५विरुद्ध २अशा मतांनी फेटाळण्यात आला. सरपंचांचा मनमानी कारभार सदस्यांना विश्वासात न घेणे मते कारणे दाखवून हा अविश्वास ठराव आणला होता .मात्र ठरावाच्या बाजूने दोनच मते पडली .हा विजय काळबादेवी ग्रामस्थांचा असल्याची प्रतिक्रिया सरपंच सौ आदिती मयेकर यांनी दिली.