
मासे पकडणे, त्याची विक्री, प्रक्रिया, वाहतूक आदींना केंद्र सरकारची परवानगी
देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व व्यवहार बंद झाले. केंद्र आणि राज्य सरकारने धोका टाळण्यासाठी मच्छीमारी, त्याची विक्री आदींवर बंधने आणली होती.लॉकडाउनच्या काळात मासे पकडणे, त्याची विक्री, प्रक्रिया, वाहतूक आदींना सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील एक पत्र केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात मासेमारीसह सर्व गोष्टी करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाउनच्या काळात बीज निर्मितीवर बंदी घातली होती. त्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. खवय्यांना बाजारपेठेत मासे मिळतील. शासनाने परवानगी दिली असली तरी यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मासे विक्री करताना या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी अशी सुचना केंद्राने दिली आहे.
केंद्राच्या सुचना प्राप्त झाल्या असल्या तरीही त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्य कार्यालयांना सुचना प्राप्त झालेल्या नाहीत
www.konkantoday.com