
माजी खासदार किरीट सोमय्या आज रत्नागिरीत,मंत्री अनिल परब विरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल होत आहेत रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी दापोली मुरुड येथे सीआरझेड कायद्याचा भंग करून रिसॉर्ट व अन्य बांधकाम केल्याचा आरोप माजी खासदार सोमय्या यांनी केला होता व याबाबत ते आज तक्रार दाखल दाखल करणार असल्याचे कळते ते रत्नागिरीत येत असून त्यानंतर ते बारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत दापोलीतील जमीन आणि रिसॉर्ट व्यवहारामुळे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आपत्ती कोसळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोमय्या यांनी तक्रार केली असून या प्रकरणाची वस्तुस्थिती ते लवकरच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत मांडणार आहेत. रत्नागिरीत आज त्यांची पत्रकार परिषद होत असल्याने या प्रकरणी ते गौप्य स्फोट करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय चक्रीवादळ घोंघावत असून पालकमंत्री परब आणि सोमय्या यांच्यातील हा राजकीय सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. या राजकीय वादळात कोण कोणाला मात देणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com