
कोकण रेल्वे मार्गावर निवसर ते कणकवली पर्यंतच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता निवसर ते कणकवली आणि कणकवली ते सावंतवाडी या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. यात कणकवली ते सावंतवाडी या दरम्यान ओव्हरहेड वायर ओढण्याचे काम सुरू आहे. जूनअखेरपर्यंत विद्युतीकरणाची सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
www.konkantoday.com