
१२ते १८ मे या ७ दिवसांच्या काळातील कोरोना अहवालात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दरवाढ राज्यात अधिक
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने
१२ते १८ मे या ७ दिवसांच्या काळातील कोरोना अहवाल जाहीर
केला असून, या आठवड्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलरुग्ण दरवाढ राज्यात अधिक असल्याचे म्हटले आहे.त्यापूर्वीच्या ५ ते ११ मे या ७ दिवसांच्या आठवड्यात सिंधुदुर्गची
रूग्णवाढ राज्यात सर्वाधिक होती ती आता दुसऱ्या क्रमांकावरआली असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता रुग्णवाढ पहिल्याक्रमांकावर आहे. विशेष म्हणजे शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात
रुग्णवाढीचा दर वाढला असून हा दर राज्यात तिसऱ्याक्रमांकाचा आहे. राज्यात सर्वात कमी रुग्ण दरवाढ मुंबईचीअसून ती केवळ ०.२३ टक्के इतकी राहीली आहे.
www.konkantoday.com