
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा,रेल्वेमंत्र्यांकडून पत्राची दखल
निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी राज्यसभा सदस्य, माजी रेल्वे मंत्री व केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. सुरेश प्रभू साहेब यांना विनंती केली होती. विनंतीला मान देऊन श्री. सुरेश प्रभू यांनी विद्यमान केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. पियुष गोयल यांना पत्र पाठविले होते. त्याला रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विभागाकडे पुढील कारवाई साठी पत्र पाठविले आहे.
www.konkantoday.com