
ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल- शरद पवार
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने काही नेते तसंच विरोधी पक्ष कोकण दौरा करत आहेत. उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे.
ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल, असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे. कोकणातल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही.त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती , ज्ञानात भर पडेल, असा उपरोधिक टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
www.konkantoday.com