
तौत्के चक्रीवादळ इतर नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत
तौत्के चक्रीवादळ इतर नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९६ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली आहे.
राज्यात दोन दिवसांपूर्वी तौत्के चक्रीवादळाने राज्यातील सात जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. या वादळाच्या तडाख्यात १० पेक्षा अधिक संख्येने मृत्युमुखी पडले आहेत. तर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झालेआहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
www.konkantoday.com