तोक्तेने हादरवलं, आमदारांनी सावरलं! राजापुर वाडापेठ येथील निराधार मुलांना आमदार राजन साळवींचा आधार

*राजापुर* तालुक्यातील वाडापेठ कालिकावाडी येथे आईबापाविना पोरकी झालेली पुजा पांडूरंग साळवी ही आपल्या दोन भावंडासह परिस्थितीशी दोन हात करीत राहते. तोक्ते वादळाने संबंध कोकणाला तडाखा दिला आणि तोक्तेच्या तडाख्यात पुजाच्या घराचे छप्पर हरवले. आमदार डॉ राजन साळवी तोक्ते वादळादरम्याने राजापुर सागरी किनारपट्टींजवळील गावांना भेट देवुन नुकसानीचा आढावा घेत फिरत असताना जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले यांनी सदरची घटना आमदार डॉ राजन साळवी यांच्या कानावर घातली. आमदारां नी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता पुजा साळवी यांच्या घराला भेट देेवुन घटनेला चोवीस तास होणेपुर्वीच पुजा साळवी यांच्या घरावर नवे छप्पर घालुन दिले. कोकणातील दमदार आमदारम्हणुन ओळख असलेल्या जनतेच्या अडीअचणीत धावुन जाणा-या आमदार डॉ राजन साळवीयांनी लोकप्रतिनिधी महणुन पुन्हा एकदा आदर्श घालुन दिला.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button