म्युकरमायकोसिस या विकारावर उपचार करण्यासाठी राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचाराची यंत्रणा उभी करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
करोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या विकारावर उपचार करण्यासाठी राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचाराची यंत्रणा उभी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, म्युकरमायकोसिस विकारावरील उपचारासाठी कान-नाक-घसा, नेत्ररोग, मेंदूविकार, प्लॅस्टिक सर्जरी इत्यादी पाच-सहा तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात असे कक्ष उभारण्यात येणार आहेत.
www.konksntoday.com