
करसल्लागार विद्याधर जोशीयांचे आकस्मिक निधन.
रत्नागिरी दिनांक २८ – येथील करसल्लागार विद्याधर विष्णू जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६८ होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा आणि मुलगी डॉ. किरण आहेमूळ भातगाव येथील ज्योतिष ( जोसपण) कुटुंबातील विद्याधर जोशी यांनी रत्नागिरी येथे बी.ए. एल.एल.एम पदव्या प्राप्त करून करसल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला होता. यात ते ४० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत होते.
तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेत बिझनेस लॉ शिकवण्याचे काम सुमारे २२ वर्ष केले होते. विद्यार्थी वर्गात ते लॉ जोशी नावाने सुपरिचित होते.रत्नागिरी नगर परिषदेच्या गॅस दाहिनी मध्ये त्यांची मुलगी डॉ किरण हिने अंत्यसंस्कार केले. त्यावेळी शेजारी, कौटुंबिक स्नेही आणि करसल्लागार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.