खताच्या किमती कमी करण्याची शरद पवार यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने तो दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं आहे. या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आणि किंमतीतील वाढ लवकर मागे घेण्याची विनंती, पवार यांनी मंत्र्यांना केली आहे.
www.konkantoday.com