रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 102 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1438,एकूण बरे झाले 857 तर 5 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी दि. 23 (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1438 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 21,कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर, गुहागर 3 आणि 10 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 24 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 48 रुग्ण
दापोली – 2 रुग्ण
घरडा, खेड – 27 रुग्ण
लांजा – 1 रुग्ण
राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे अनुक्रमे वय 71 व 40 वर्षे अशी आहेत. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .

रत्नागिरी – 9
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 11
चिपळूण – 9
संगमेश्वर – 6
लांजा – 2
राजापूर – 3
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1438
बरे झालेले – 858
मृत्यू – 49
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 531
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (२२ जुलै २०२० पर्यंत)
जिल्ह्यात सध्या 131 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 21 गावांमध्ये, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 61 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 81, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 6, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 3, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, केकेव्ही, दापोली – 12 असे एकूण 106 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 17 हजार 659 इतकी आहे.
13 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 15 हजार 244 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 14 हजार 698 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1391 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 13 हजार 295 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 546 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 546 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 22 जुलै 2020 अखेर एकूण 2 लाख 3 हजार 619 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 1 हजार 325 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 23 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button