
मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामती पुरतीच – प्रकाश आंबेडकर
कोरोनासंदर्भात राज्यात उडालेल्या बोजवाऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सध्या महाराष्ट्र शासन पुर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामती पुरतीच असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला आहे. यामुळेच उच्च न्यायालयावरच सर्व आदेश देण्याची वेळ आली, असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ते अकोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
www.konkantoday.com