
रिंकु राजगुरु चाहत्यांवर संतापली
अभिनेत्री रिंकु राजगुरुला ‘सैराट’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. नुकतेच जळगावमध्ये शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला रिकूंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिकूंला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत रिंकुला एका चाहत्याचा धक्का लागला. यामुळे ती संतापल्याचे पाहायला मिळाले.कार्यक्रम संपल्यानंतर रिंकु बाहेर पडत असताना सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतून बाहेर पडताना रिंकुला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली. ‘तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? ‘असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.www.konkantoday.com