
आंबा घाटाच्या सुरुवातीला मुर्शीजवळ मातीची दरड रस्त्यावर
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम चालू आहे कालपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे
साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे आज सकाळी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली
ही दरड रस्त्याच्या एका बाजूला आल्याने एका बाजूची वाहतूक बंद झाली ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सध्या घाटात चाललेल्या कामामुळे या भागातून जाताना वाहन चालक आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे




